प्रियांश आर्याचे वेगवान अर्धशतक   

अचानक आलेल्या पावसाने सामना खोळंबला

कोलकाता : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी झालेल्या आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने २० षटकांत २०१ धावा केल्या. 
 
यावेळी सलामीवीर प्रियांश आर्या याने ६९ धावा करत वेगवान अर्धशतक केले. त्यावेळी त्याने ४ उत्तुंग षटकार आणि ८ चौकार मारले. त्याला साथ देताना प्रभासिमरान आर्या याने ८३ धावा करत दुसरे अर्धशतक केले. तर तिसर्‍या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर याने नाबाद २५ धावा केल्या. मॅक्सवेल याने ७ धावा केल्या. त्याला वरुण चक्रवर्ती याने त्रिफळा उडवत बाद केले.  
 
जॅसन याने ३ धावा केल्या. वैभव अरोरा याने त्याला व्यंकटेश अय्यरकडे झेलबाद केले. जोश इंग्लिश याने नाबाद ११ धावा केल्या. तर अवांतर ३ धावा संघाला मिळाल्या. त्यानंतर कोलकात्याचा संघ फलंदाजीसाठी आला. कोलकात्याने ७ धावा केल्या. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सामना खोळंबला. 

Related Articles